डॉ.बी.डी.चव्हाण यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
प्रतिनिधी :अशोक इंगोले हिंगोली
नांदेड- हिंगोली लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नुकतीच निवडणूक लढविली होती. परंतु त्यांना त्यात अपयश आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साथ देण्यासाठी ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षप्रवेश करून महाराष्ट्रावर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी स्वगृही म्हणजेच शिवसेना ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केला.नांदेड जिल्हा दौऱ्यावर रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे आले असता त्यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले. त्यांच्या समवेत शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. डॉक्टर बी. डी. चव्हाण हे मूळचे शिवसैनिक. परंतु काही कारणास्तव त्यांनी नुकताच वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली व प्रचंड मताधिक्येही मिळविले. मात्र तिथे त्यांचे मन रमले नाही. रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात डॉ. बी. डी. चव्हाण यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, घरातील माणसाचा रुसवा जास्त वेळ राहत नाही. त्याच पद्धतीने डॉक्टर बी. डी. हे आपल्यातून काही वेळ बाहेर गेले होते मात्र ते पुन्हा आपल्याच घरात आले त्यांचे त्यांनी स्वागत केले. संकटकाळी उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहून येणाऱ्या विधानसभेवर भगवा फडकवू असा विश्वास डॉ. चव्हाण यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हा महिला आघाडीच्या माजी संघटक डॉक्टर निकिता चव्हाण, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख बबन बारसे, शहरप्रमुख गौरव कोडगिरे, शिवसेना ठाकरे गटाच्या उत्तरच्या उमेदवार संगीता विठ्ठल पाटील, विठ्ठल पाटील डक यांच्यासह शिवसेनेचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.